महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी प्रथम

ननाशी l प्रतिनिधी :- जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत शिक्षण पंचायत समिती दिंडोरी यांच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात टप्पा 2 मध्ये जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी हे विद्यालय केंद्रस्तरावर प्रथम आले त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अहिरे डि.एन सरांचा पंचायत समिती दिंडोरी येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी श्री. चंद्रकांत गवळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी व श्री. भास्कर रेंगडे गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी केंद्रप्रमुख भोये सर व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते यावेळी जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी या विद्यालयाचा केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे संस्थेचे संस्थापक श्री. भास्करराव  सावंत संस्थेचे अध्यक्ष श्री.टि.बी सावंत सर सचिव श्री.एस बी सावंत सर तसेच विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने