महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिंगळचोंड - उंबरदे रस्त्याची दुर्दशा कायम लाखो रुपयांचा निधी खर्चुनही परिस्थिती जैसे थे; नागरिकांमध्ये संताप

बोरगाव l प्रतिनिधी: ग्रुप ग्रामपंचायत खोबळा (मा.) हद्दीतील शिंगळचोंड गावाशेजारील माणी ते पळसन हा मुख्य रस्ता गेल्या चार, पाच वर्षांपासून अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला असून, प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. शिंगळचोंड ते उंबरदे या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे अंगावर संकट ओढवून घेण्यासारखे आहे.
     ग्रामपंचायतीमार्फत मागील वर्षी तसेच यावर्षी लाखो रुपये खर्च केल्याचा दावा केला जात असला, तरी रस्त्याची अवस्था जशीच्या तशीच आहे. त्यामुळे खर्च कुठे झाला? याचा हिशेब द्यावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
    गाव बाबतीत राहिले आहे. मिशनअंतर्गत शिंगळचोंड विकासकामांच्या मागासलेलेच जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम झाले असले, तरी ते जुन्याच विहिरीवर आधारित असून, आज तेही ठप्पच आहे.
    ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, विकासाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे दाखवली जातात, प्रत्यक्षात गावातील जनता वंचितच आहे. यापुढेही प्रशासन व जनप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने