दिंडोरी l मनोज पाटील:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्रीपाडा येथे आज कार्तिकस्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळ, नाशिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची मोठी मदत झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शांताराम पवार (नायब तहसीलदार), डी. एल. जोपळे (प्रादेशिक व्यवस्थापन), डी. पी. भरसट (वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी), एच. एस. बहिरम (उप. प्रादेशिक व्यवस्थापन), दिलिप चव्हाण (प्राथमिक शिक्षक व संस्था डायरेक्टर) आणि रामदास गायकवाड (प्राथमिक शिक्षक – वणी) उपस्थित होते.
या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक नारायण भुसार, मोहन चौधरी, रामचंद्र चौधरी तसेच तरुण मित्र मंडळाचे सदस्य सोमनाथ चौधरी, जय राम चौधरी, कृष्णा चौधरी, विजय चौधरी, देविदास गायकवाड, अंगणवाडी सेविका भारतीबाई चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाला हातभार लावला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थित मान्यवर आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.