बोरगाव l लक्ष्मण बागुल:- दि.5 सप्टेंबर 2025 रोजी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमाशाळा अलंगून तालुका सुरगाणा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
आश्रमशाळेचे प्राचार्य श्री वाकचौरे सर, बी के जाधव सर,उर्मिला गावीत, निर्मला गावीत आजच्या शिक्षक दिनाचे प्राचार्य मुकेश गावीत, मुख्याध्यापिका वृषाली भोये यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले, श्री वाकचौरे सर यांनी शिक्षक दिनाचे महत्व समजून सांगतांना म्हंटले डॉ सर्वपल्ली राधाकृषनन हाडाचे शिक्षक होते, एक आदर्श तत्वज्ञानी म्हणून त्यांनी संपूर्ण जगासमोर शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे, त्यांचा आदर्श घेऊन गुरुजणांनी विध्यार्थ्यांना ज्ञान दिले पाहिजे, आणि विध्यार्थ्यांनी शिक्षक दिनी चांगले संकल्प करून अभ्यास आणि जिद्दीने आपले आयुष्य यशस्वी केले पाहिजे. असे आवाहन केले.
शिक्षक आणि शिक्षिकेच्या रूपात आज तीस ते पस्तीस मुलांमुलींनी शिक्षकाचे पेहराव करून पंधरा पंधरा मिनिटांच्या तासिकेचे नियोजन करून विध्यार्थ्यांना अध्यापन केले.
यावेळी उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभागातील विध्यार्थ्यांनी पहिली ते बारावी पर्यंत अध्यापन करत असलेल्या शिक्षकांना प्रत्येकी एक पुस्तक आणि स्वयंनिर्मित शुभेच्छा पत्राचे ग्रीटिंग कार्ड देऊन शिक्षकांप्रति ऋणानुभव व्यक्त करून गुरुजणांचा सन्मान केला. विध्यार्थी तथा आजचे प्राचार्य मुकेश गावीत यांनी सांगितले की आम्हीं विध्यार्थी या आश्रम शाळेत पहिलीपासून ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असतो, येथील प्रत्येक शिक्षकाणे आम्हाला शिकवले आहे, आमच्यावर उत्तम संस्कार केले आहेत त्यामुळे आम्हीं चांगले शिक्षण घेत आहोत, याची आम्हा विध्यार्थ्यांना जाणीव असल्याने आम्हीं गुरुजणांचे ऋण फेडण्यासाठी हे छोटेसे कार्य केले आहे. प्राध्यापक श्री आर एच गांगुर्डे सर, देवरे म्यॅडम, वाघ सर, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने आजचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आश्रमशाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि शळेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते....
***************----***********