दिंडोरी l वैभव पगार: कादवा कॉम्प्युटर एज्युकेशन या एमकेसीएल मान्यताप्राप्त लर्निंग सेंटरमध्ये ग्लोबंट इंडिया प्रा. लि. या जागतिक दर्जाच्या IT व सॉफ्टवेअर सेवा कंपनीच्या CSR प्रकल्पा अंतर्गत कौशल्यविकास उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या प्रकल्पातून आमच्या सेंटरमध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांना नेटवर्क सपोर्ट या कोर्स चे प्रशिक्षण देण्यात आले.
ग्लोबंट इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय IT कंपनीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक कौशल्यच आत्मसात केले नाही तर रोजगारक्षमतेसाठी आवश्यक आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञानदेखील मिळवले. विशेष म्हणजे, आमच्या सेंटरमधील अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी प्लेसमेंट झाली आहे.
आमच्या कादवा कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरसाठी हा ग्लोबंट इंडिया प्रा. लि. CSR प्रकल्प एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. आम्ही ग्लोबंट इंडिया प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय कंपनीचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातील योगदानामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत.