दिंडोरी l मनोज पाटील:- वक्रतुंड मित्र मंडळ शिवाजीनगर दिंडोरी यांच्या वतीने, तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक व सेवा फाउंडेशन यांच्या सहयोगाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणपती मंदिराजवळ, शिवाजीनगर दिंडोरी येथे संपन्न झाले.
या शिबिरामध्ये १०० नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली
या शिबिराचे आयोजन वक्रतुंड मित्र मंडळ, शिवाजीनगर यांनी केले.
या शिबिरामध्ये तुलसी आय हॉस्स्पिटलचे ऑप्टोमेट्रीस्ट गोविंद माने व वक्रतुंड मित्र मंडळ, शिवाजीनगर चे सर्व सदस्य, नागरिक उपस्थित होते.