महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जेष्ठ नागरिक संघ दिंडोरीतर्फे शिक्षक दिन साजरा

दिंडोरी l वैभव पगार : जेष्ठ नागरिक संघ दिंडोरी यांच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी आर राजे होते.
   या कार्यक्रमात जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, जेष्ठ शिक्षक संतोष कथार, क्रीडाशिक्षक जीभाऊ देवरे, बाळासाहेब रायते, एस. व्ही. शेटे, योगेश गांगुर्डे ,बाळासाहेब निकम सर, प्रशांत शेळके सर आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे बी आर राजे, प्रमोद पाटील,सैय्यद सर,दिलीप शिंदे,दगुजी सोनवणे सर,गांगोडे सचिव, सुदामराव शिंदे, वसंतराव बस्ते,बाबुराव अपसुंदे,लक्ष्मण पवार,माणिकराव देशमुख,संतु मोरे,अण्णासाहेब कदम आदींसह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      प्राचार्य शरद शेजवळ सरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "जेष्ठ नागरिक संघाने आम्हा शिक्षकांचा गौरव करून आमच्यावर एक ऋणच लादले आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्राचा पाया शिक्षक आहे, परंतु या पायाला मान्यता देणारे, त्याचे स्मरण ठेवणारे आपण जेष्ठ नागरिक आहात, याबद्दल आम्ही मनःपूर्वक ऋणी आहोत."
     याप्रसंगी त्यांनी शिक्षक या नात्याने समाज घडविण्याची जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली शाळा-गाव-पालक यांची त्रिसूत्री आणि आजच्या काळात शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत "आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच आमचे खरे बळ आहे" असे सांगितले.
कार्यक्रमात जेष्ठ शिक्षक संतोष कथार, जीभाऊ देवरे, बाळासाहेब रायते यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
    जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुदामराव शिंदे,माजी केंद्रप्रमुख सैय्यद सर यांनी मनोगत व्यक्त करून जेष्ठ नागरिक व शिक्षक दिनाचे महत्व सांगितले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी आर राजे यांनी सर्व धर्मसंमभाव या विषयावर मार्गदर्शन करून विविध भाषेत मनोगत व्यक्त करताना जेष्ठ नागरिक संघाचे कार्य व शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा गुणगौरव करण्याचा उद्देश सांगितला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेवटी उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा व सत्कारामुळे शिक्षक दिन अधिक संस्मरणीय ठरला.
सूत्रसंचालन दगुजी सोनवणे सर यांनी तर आभार दिलीप शिंदे यांनी मानले.
दिंडोरी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करतांना संघाचे पदाधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने