अलंगुण l कृष्णा पवार:- अलंगून ता. सुरगाणा येथे उद्या दिनांक ४ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी आपल्या गावातील गणराजे मित्र मंडळ, अलंगून यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध आजारांची तपासणी, मार्गदर्शन तसेच डोळ्यांची तपासणी करून आवश्यक ते उपचार व सल्ला दिला जाणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणराज्य मित्र मंडळ अलंगुन करण्यात आहे.
शिबिराचे मार्गदर्शन अक्षय सोनवणे सर, राकेश महाले सर व राजेश मिश्रा सर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तसेच गावातील सर्व नागरिकांनी व आजूबाजूचा परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.