महाराष्ट्र ट्रायबल न्युज

गुजरात सीमेजवळील लपीग्रस्त गावांमध्ये लसीकरण सुरू

बोरगाव l लक्ष्मण बागुल :- सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेजवळील २० गावांमध्ये लंपी व एफएमडी या आजाराने गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातले आहे. यामुळे ७ ते ८ जनावरांचा मृत्यू झालेला होता. जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा रोग नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश आहेर या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू झाले आहे. 
    सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेजवळील गोंदूने बर्डीपाडा, पांगारणे, रगतविहीर परिसरातील २० गावांमध्ये लंपी व एफएमडी या आजाराची साथ आलेली होती. मात्र, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कार्यस्थळी राहत नसल्याने आदिवासी पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. दैनिक दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट गुजरात सीमेजवळील चार पाच गावांना भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. याच बरोबर ७ ते ८ जनावरांचे सॅम्पलही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी घेतले. पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १) गोंदूने, कुकुडणे, रगतविहीर या गावांमध्ये आदिवासी पशुपालकांची बैठक घेत त्यांना लसीकरणाबाबतचे नियोजन सांगण्यात आले. मंगळवारी (दि. २) बर्डीपाडा, चिंचला वडपाडा गोंदूने, केळीपाडा पांगारणे या गावांमध्ये लसीकरण करण्यात आले 
-
लसीकरणांमध्ये यांचा समावेश 
लंपी व एफएमडी आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शिंदे, डॉ. शेख डॉ. अविनाश अनंतवाड, डॉ. पाडवी यांच्यासह दोन शिपाई व सात खासगी पशुवैद्यक डॉक्टरांची मदत घेत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण अजून आठवडाभर चालणार आहे. दैनिक दिव्य मराठीमध्ये लंपी आजाराच्या साथीचे वृत्त पसरतात अनेक शेतकऱ्यांनी संपर्क साधत लसीकरण सुरू झाल्याची माहिती देत आभार मानले.
-
गोचीड इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी:- 

तालुक्यातील याच भागामध्ये लंपी व एफएमडी या आजारांसह अनेक जनावरांना गोचीड झालेले आहेत. मात्र या आजारावर पांगारणे पशुवैद्यक दवाखान्यात अजूनही इंजेक्शन उपलब्ध नाही. हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने