महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी नगरपंचायततर्फे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान उपक्रम

दिंडोरी l वैभव पगार :- स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा" राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिंडोरी नगरपंचायततर्फे मा. मुख्याधिकारी संदिप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत.
   आज दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी “श्रमदान : एक दिवस, एक तास, एक साथ” या संकल्पनेखाली दिंडोरी बाजारतळ व बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत जनजागृती केली.
   या उपक्रमात नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी श्री. विजय देवरे, लेखापाल नागेश भालेराव, पाणीपुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र कांदळकर, लिपिक सचिन जाधव, सचिन बोरस्ते, राजेंद्र खिरखाडे, राजेंद्र गायकवाड, रमेश सोनवणे, तानाजी निकम, सागर भदाणे, रामा चारोस्कर, साहेबराव गांगुर्डे, अशोक गांगुर्डे यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने