महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, वनारेतर्फे माजी विद्यार्थी कु.हर्षद बागुल यांचा भव्य सत्कार सोहळा.

दिंडोरी l प्रतिनिधी:- गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा अभिमान ठरलेल्या वनारे गावच्या सुपुत्राने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेचा माजी विद्यार्थी कु. हर्षद प्रभाकर बागुल यांनी (MPSP) संयुक्त गट- ब परीक्षा 2024 मधून (ASO) Assistant Section Officer या पदावर अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे.
    या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, वनारेतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सत्कार मूर्ती कु. हर्षद दादांचे शाळेत प्रवेशद्वारावर औक्षण करून लेझीम व ढोल पथकाद्वारे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात सत्कार समारंभ पार पडला.
शाळेमार्फत कु. हर्षद दादाचा पुस्तक , शाल, श्रीफळ तसेच वडाचे झाड देऊन गौरव करण्यात आला. तसेचकु. हर्षद दादाच्या आई -वडीलांचाही पुस्तक,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर कु. हर्षद दादांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “अभ्यासात सातत्य, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळे कोणतीही स्पर्धा जिंकता येते” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.  
      हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून,कु.हर्षद दादांचे यश हे वनारे शाळेचे अभिमानाचे सुवर्णपान ठरले आहे. 
      यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक सरपंच मा.श्री. दिपकभाऊ झिरवाळ, शा.व्य.स. अध्यक्ष श्री. हरिदास झिरवाळ, ज्येष्ठ नागरिक अशोकभाऊ झिरवाळ, जगन्नाथ गवळी, हरिभाऊ चौधरी,नवनाथ झिरवाळ, प्रकाश झिरवाळ ( शा. व्य. स. माजी अध्यक्ष) तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चौधरी सर, शिक्षकवृंद श्री. सहारे सर, श्रीम.गावित मॅडम, .सोनी भोये, मोहना आई व संगीताताई यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने