महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी पंचायत समितीचे 2025 चे आरक्षण जाहीर

दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंंडोरी पंचायत समितीच्या 12 गणाची आरक्षण सोडत दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय अधिकारी, कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेद्वार उपस्थित होते. 
      यावेळी दिंडोरी पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी तहसिलदार मुकेश कांबळे हे उपस्थित होते. दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी सुरवातीला वणी गटातील लखमापूर गण हा लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती आरक्षित करण्यात आला. त्यानंतर अनुसूचित जमातीचे 7 गण जाहीर करण्यात आले. त्यानंतर ओबीसी 3 गण तर सर्वसाधारण 1 गण जाहीर करण्यात आला. अनुसूचित जमाती आरक्षण जाहीर झाल्यानंतर 7 गणांपैकी 4 गण महिला राखीव करण्यात आले तर 3 गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण जाहीर करण्यात आले. तसेच ओबीसी 3 गणांपैकी दोन गण ओबीसी महिला व एक ओबीसी सर्वसाधारण गण जाहीर करण्यात आला. यावेळी महिला व पुरुष आरक्षणासाठी चिठ्ठ्या बनवून लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आले. त्यामुळे यावर कोणाचीही हरकत नसल्याने तहसिलदार मुकेश कांबळे यांनी सर्वांसमोर लोकसंख्येनेनुार 12 गणांची आरक्षण जाहीर केले व त्याचे निरीक्षण दिंडोरीचे दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी केले. 12 गणांपैकी मडकीजांब गणाऐवजी नळवाडपाडा हा नवीन गण तयार करण्यात आला आहे.
 *आरक्षणाने अनेकांचा हिरमोड*
दिंडोरी पंचायत समितीचे 12 गणाचे आरक्षण झाल्यानंतर 7 गण राखीव झाले. दिंडोरी तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही राखीव झाल्याने इच्छुक उमेद्वारांचे हिरमोड झाले असून हे इच्छुक उमेद्वार जिल्हा परिषद निवडणूकीत कोणती भुमिका बजावणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच जिल्हा परिषद 6 गट राखीव झाल्याने प्रत्येक पक्षाला अनुसूचित जमातीचा उमेद्वार शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण

खेडगाव - अनुसूचित जमाती महिला 
कसबे वणी- अनुसूचित जमाती 
कोचरगाव - अनुसूचित जमाती
अहिवंत वाडी-अनुसूचित जमाती 
उमराळे बु.- अनुसूचित जमाती
मोहाडी-अनुसूचित जमाती

दिंडोरी तालुक्यातील पंचायत समिती 12 गणाचे आरक्षण

टिटवे- अनुसूचित जमाती महिला
अहिवंत वाडी- अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी- अनुसूचित जमाती
लखमापूर-अनुसूचित जाती 
कोचरगाव-अनुसूचित जमाती महिला 
नळवाड पाडा-अनुसूचित जमाती 
उमराळे बु -अनुसूचित जमाती महिला
ननाशी-अनुसूचित जमाती 
खेडगाव-ओबीसी महिला
मातेरेवाडी- ओबीसी महिला
मोहाडी- सर्वसाधारण
पालखेड बंधारा- ओबीसी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने