दिंडोरी । प्रतिनिधी :-जीवनात कर्म महत्त्वाचे असतात. पूजा अर्चा करुन देव जरी प्रसन्न झाला तरी कर्माचे फळ कुणालाच चुकत नाही. त्यामुळे कर्म करतांना चांगलेच कर्म करावे, असे प्रतिपादन शिवअर्ध नारेश्वरी धार्म बिलमाळ मठाचे मठाधिपती प.पूज्य अनेकरुपी महाराज यांनी केले. तिळवन येथे गणेश चतुर्थीनिमित्त उत्सव सोहळा संपन्न झाला. अनेकरुपी महाराज यांचा संत्सग संंपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणालेे की, आपण जीवन जगतांना भारत मातेची सेवा केली पाहिजे. भारत माता म्हणजे आपण आपल्या आईचेही सेवा करावी. जीवनात प्रत्येकाला हौसमजा करायची आहे. या ब्रम्हाडांत अनेकांनी जन्म घेतला आहे. अनेकांना संसार करायचा आहे. परंतू सर्वांनी आपले कर्म भारत मातेच्या चरणावर अर्पण करायचे आहे. आपण जशी संगत धरतो तसे आपण घडत जातो, म्हणून चांगली संगत करावी, चांगले वागावे, खोटे बोलू नये, दुसर्यांचे हित सुध्दा बघावे, असा उद्देश अनेकरुपी महाराज यांनी दिला. सुमारे पाच ते सात हजार भाविक कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीमा संंतोष पाटील, भुषण गुंजाळ, रविंद्र वाघ, राकेश गुंजाळ, संजय गुंजाळ, नितीन गुंजाळ, अशोक पवार, दत्तात्रय गुंजाळ, सुरेश सोनवणे, समाधान सोनवणे, सुनील नायर, शंकर दळवी, दिंडोरीचे ज्येष्ठ नेते रमेश बोरस्ते, नगरसेवक नितीन गांगुर्डे, विजय घुसळ, दत्तात्रय आहेर, परशराम बच्छाव, अनील भदाणे, पोपटराव आहेर, संतोष भागवत आदींनी परिश्रम घेतले.