महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रस्त्यांवरील खड्डे बुजवा, गोकुळ झिरवाळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश

दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून सतत पडणार्‍या पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांना मोठमोठे ख्ड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहनचालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे.  अनेक गावातील ग्रामस्थांकडून वारंवार खड्डे भरण्याची मागणी होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांंच्या वतीने युवा नेते गोकूळ झिरवाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करुन त्वरीत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहे. 
    दिंडोरी पश्‍चिम भागातील लखमापूर फाटा - भनवड रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वाहनांचेही नुकसान होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. यासाठी  या रस्त्याला खड्डे पडल्याने ग्रामस्थांकडून वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 1 व 2 विभागाशी चर्चा करुन त्वरीत खड्डे बुजवण्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यातील उमराळे - दिंडोरी - पालखेड  ते पिंपळगंाव बसवंत या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाल्यामुळे तसेच या रस्त्याच्या कामांना मजूरीही मिळाल्याने या रस्त्याच्या कामाला त्वरीत सुरवात करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी गोकूळ झिरवाळ यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेत झालेल्या रस्त्यांचीही दुरावस्था झाल्यामुळे याही रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी तालुक्यातील जनतेकडून वारंवार केली जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्यांच्या कामावर सदर विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे सदर रस्त्यांचे कामे एक ते दिड महिन्यातच खराब होण्यास सुरवात होते. अनेक वेळा सदर विभागाशी चर्चा करुनही त्यांच्या कामाच्या पध्दतीत बदल झालेला दिसून येत नसल्यामुळे या अधिकार्‍यांनाही लोकप्रतिनिधींनी कानउघडणी केल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. तालुक्यातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यात यावे, अशी सूचना युवा नेते गोकूळ झिरवाळ यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 1 व 2 अधिकार्‍यांना दिल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने