महाराष्ट्र ट्रायबल न्युज

उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांचा दिव्यांग शेतकऱ्यांशी संवाद

दिंडोरी: प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे दिंडोरी येथील उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी नुकतीच दिव्यांग शेतकरी बांधवांसोबत झालेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी,दिव्यांग शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे नमूद केले.
    यावेळी दिव्यांग बांधवांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन नागरे यांचा सन्मान केला.
     दिंडोरी परिसरातील विविध दिव्यांग शेतकरी सदिच्छा भेटी प्रसंगी,वीजपुरवठा, नवीन कनेक्शन, वीज बील समस्या अशा विविध विषयांवर चर्चा झाली. दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या मांडताना प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
      यावेळी उपकार्यकारी अभियंता नागरे यांनी दिव्यांग शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत त्यावर तातडीने उपाय करण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम कटिबद्ध आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना सेवा मिळावी, हीच आमची प्राथमिकता असून, दिव्यांग बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांची अडचण ही माझी वैयक्तिक जबाबदारी असल्याचे नागरे यांनी यावेळी सांगितले.
     यावेळी उपस्थित बांधवांनी प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत आभार व्यक्त केले. हा संवाद स्नेह, समजूतदारपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे उदाहरण ठरला.यावेळी दिंडीरी कक्ष -1 कनिष्ठ अभियंता नागरे, भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा खतवड उपसरपंच सुकदेव खुर्दळ,वीज वितरणचे पागे, महेद्र पैठणे, विलास कदम,चंद्रभान बोरस्ते, नाठे,एकनाथ लोखंडे,दतू कदम,गणपत उगले, सुरदास पावसे,आदीसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. 

"दिव्यांग शेतकरी बांधवांकडून उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष सुकदेव खुर्दळ, कदम,चंद्रभान बोरस्ते आदी."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने