महाराष्ट्र ट्रायबल न्युज

गडावरून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीचा अपघात दोन ठार एक जखमी

दिंडोरी प्रतिनिधी :- दसऱ्याच्या दिवशी सप्तश्रुंगी गडावरून दर्शन करून दिंडोरी कडे परतत असताना निळवंडी येथील युवकांच्या दुचाकीचा पिकअप सोबत ओझरखेड शिवारात अपघात होत या अपघातात एक युवक जागीच तर दुसरा युवक उपचार दरम्यान मयत झाला असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. एक युवक गंभीर जखमी असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ मोटरसायकल व महिंद्रा पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात अमोल भगवंत गवारी (21) रा. निळवंडी ता. दिंडोरी हा तरुण जागीच ठार झाला तर अनिल सुखदेव गवारी (25) व गोपी सुरेश गवारी (20) दोघेही रा. निळवंडी हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. परंतू उपचारादरम्यान गोपी सुरेश गवारी या युवकाचा मृत्यू झाला आहे.वणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने