महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशीचे यश.

ननाशी l प्रतिनिधी:- दि.3 व 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या दिंडोरी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जनता विद्यालय ननाशीचे 14 वर्ष वयोगटात गवळी रोशन रामकृष्ण 600मी. धावणे द्वितीय 17 वर्ष वयोगटात साक्षी प्रकाश पवार 400मी.व 200मी. या दोन्ही प्रकारात प्रथम व 19 वर्ष वयोगटात 200मी. धावणे साक्षी मोहिते द्वितीय. चैताली हिंडे 100मी. तृतीय ओमकार शेखरे 200मी. तृतीय साक्षी मोहिते 800 मी.व 400मी. धावणे तृतीया आली यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. भास्करराव सावंत व अध्यक्ष श्री. तुषार भास्करराव सावंत तसेच सचिव श्री स्वप्निल भास्करराव सावंत शाळेचे मुख्याध्यापक श्री. अहिरे डी एन. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री स सूर्यवंशी सर पवार सर जाधव सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने