निवाणे l वसंतआहेर :- चैतन्य महिला मंडळ या सामाजिक संस्थेतर्फ दरवर्षी वृद्धाश्रम,अनाथ आश्रम, व ग्रामीण भागातील शाळा आदी ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून नुकताच नांदुरी येथील वृद्धाश्रमात वृद्धासाठी मदतीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने संस्थेला शालेय साहित्य वाटप करण्यासाठी ग्रामीण भागातील व विविध क्षेत्रात विद्यार्थांनी यश संपादन करणाऱ्या शाळेची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली असता सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले निवाणेचे उपसरपंच दिनकर आहेर व गंगा नाना पगार यांनी निवाणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे नाव सुचवून त्याच ठिकाणी प्राथमिक स्वरूपात उपसरपंच दिनकर आहेर यांच्याकडे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
निवाणे येथे नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे विद्यालय असून या विद्यालयात परिसरातील गोरगरीब विद्यार्थासह सर्वच विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांनी मेहनतीने या विद्यालयातील विद्यार्थांना विविध स्पर्धेमध्ये व कलागुनांमध्ये यश मिळवून दिले आहे व शैक्षणिक प्रगतीतही सतत यश संपादन केले आहे असेच ग्रामीण भागातील विद्यालय संस्थेला अपेक्षित होते.
सदर संस्थेकडून मिळालेल्या शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थाना उपसपंच दिनकर आहेर,वसंत आहेर,भास्कर आहेर,पपू आहेर, मुख्याध्यापक संजय देवरे, शिक्षक राजेंद्र चव्हाण, पोपट वाघ,निलेश सोज्वळ,पंडित जाधव,शांताराम कोल्हे,राहुल आहेर,राजेंद्र पवार,सौ संगीता आहेर, श्रीमती पल्लवी ठाकरे,श्रीमती योगिता निरगुडे,श्रीमती सुनंदा देशमुख,वनाजी अहिरे (लिपिक) राजेंद्र अहिरे आदीच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वसंत आहेर यांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थांनी विविध स्पर्धेत व परीक्षेत चांगल्या प्रकारे यश संपादन करून तालुका व जिल्हा स्तरावर विद्यालयाचे नाव चमकवीत असल्याने शिक्षक व विद्यार्थांचे कौतुक करून यापुढेही असेच शिक्षकाच्या मेहनतीला विद्यार्थांनीही अभ्यासाच्या वेळा ठरवने,मोबाईलचा वापर कमी करणे,शिक्षकांनी शिकविलेले अभ्यासक्रम घरी जाऊन पडताळणी करने आदी उपक्रम राबवल्यास अधिक यश गाठता येईल असे आवाहन केले.
मुख्याध्यापक संजय देवरेंनी ही विद्यार्थांना कार्यक्रमा बद्दल व विद्यार्थांना सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करून सदर चैतन्य महिला मंडळ संस्थेच्या पदाधिकारी यांनी उपसरपंच दिनकर आहेर व गंगा पगार यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटपासाठी विद्यालयाची निवड केल्याने शाळा व्यवस्थापन समिती,विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने आभार मानले.