महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कचुरपाडा येथे आगग्रस्त कुटुंबास आधार मैत्री फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था कडून मदत

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा गावातील रहिवासी श्री. अर्जुन महादु जाधव (वय ८०) यांच्या घराला बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चहा करीत असताना अचानक गॅस सिलेंडरचा भडका होऊन आग लागली. या आगीत घरासह जिवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते.
    या घटनेनंतर आधार मैत्री फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर मदत निधीसाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकूण ₹१८,२७६/- इतका निधी जमा झाला.
    या निधीतून श्री. अर्जुन जाधव यांना किराणा साहित्य स्वरूपात मदत देण्यात आली. या प्रसंगी आधार मैत्री फाऊंडेशनचे बापू गारे, भोये सर, नामदेव पाडवी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने