महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सप्तशृंगी गडावर छबिना उत्सव

सप्तशृंगी गड l प्रतिनिधी- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खानदेशसह विविध प्रांतातून मजल दरमजल पायी प्रवास करत कावडीच्या माध्यमातून आणलेल्या जलाने श्री भगवतीवर सोमवार (ता. ६) सायंकाळी ७ वाजेपासून पुरोहितांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेकास सुरवात झाली. रात्री बारा वाजता सांजशृंगार करून श्री भगवतीची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाआरती करण्यात आली. यावेळी तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव पार पडला. 
     सोमवारी (ता. ६) वाजता ट्रस्टच्या मुख्यकार्यालयातून श्री भगवतीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी (ता.६ ) सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न झाली. यावेळी तळोदा येथील आई सप्तशृंगी सेवा समिती यांच्या मार्फत श्री भगवतीस चिंतामणी रंगाचे भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले. त्यानंतर श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न झाली. तत्पूर्वी प्रात समयीची काकड आरती महानैवेद्य आरती महामंडलेश्वर ममता नंदगिरी यांनी केली. दुपार सत्रातील सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिने अभिनेते मिलिंद गुनाजी, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केली. दुपार पासूनच शिवालय तलाव परिसरातून छबिना मिरवणुकीस सुरुवात झाली. दुपार पासून कावडधारक भाविकांनी आपल्या कावडीतील जल मंदिरात संकलन करण्यास सुरवात केली होती. सायंकाळ सत्रात देवीची सांज आरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिर विभागात कावडीधारकांकडून प्राप्त करून संकलित केलेल्या जलाद्वारे श्री भगवतीच्या मूळ मूर्तीवर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक पंचामृत जलाभिषेक महापूजा करण्यात आली. यावेळी विसरवाडी येथील श्री शनेश्वर पदयात्रा यांच्या मार्फत श्री भगवतीस गुलाबी रंगाचे भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले. यावेळी श्री भगवतीस सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, सोन्याचे पुतळ्यांचे गाठले, सोन्याचा मयूर हार, सोन्याची मोहनमाळ, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपट्टा, चांदीचा मुगुट आदि अलंकार परिधान करण्यात आले होते. यावेळी ट्रस्ट विश्वस्त अॅड. ललित निकम, व्यवस्थापक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहा. मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, मंदिर पर्यवेक्षक सुनिल कासार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने