बोरगाव l लक्ष्मण बागुल:- सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण येथे प्रो कबड्डी लीग आयोजित करण्यात आली होती. यात ८ संघानी सहभाग घेतला होता. राशा येथील ठाकरे किंग संघाने मालगव्हाण प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावत २५ हजार रोख व ट्रॉफी आपल्या नावे केली.
मालगव्हाण येथे आयोजित मालगव्हाण प्रो कबड्डी लीगमध्ये तालुक्यातील ८ संघाने सहभाग नोंदवला. दोन दिवस ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान वडपाडा येथील जे. पी . वॉरियर्स संघाने मिळवत १५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. मालगव्हाण येथील साई मलिक संघाने ७ हजार रुपयांचे बक्षीस मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.खेड येथील किंग मेकर यांना ५ हजाराचे चौथे बक्षीस देण्यात आले. योगेश ठाकरे, सुरेश चौधरी, सागर पवार, जाकीर भाई यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली.
लीग यशस्वी होण्यासाठी उध्दव महाले, योगेश गावित, अशोक चौधरी, निकू महाले, लहानु चव्हाण, सुभाष चौधरी व क्रिकेट प्रेमींनी मोलाचे सहकार्य केले.
--
स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द सिरीज -प्रकाश देशमुख(ठाकरे किंग), बेस्ट डिफेंडर- योगेश कनोजे (ठाकरे किंग), बेस्ट रेडर्स - मनोज धूम (जे पी वॉरियर्स) यांना विशेष बक्षिस देण्यात आले.