ननाशी l प्रतिनिधी:- भगवान बिरसा मुंडा सुवर्णजयंती उत्सवानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय एकलव्य रेसीडेन्सीअल स्कुल नाशिक येथे घेतलेल्या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेत किसन भोंडवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (हस्ते) या शाळेने प्रथम क्रमांक मिळवीला आहे.
या स्पर्धेत अप्पर आयुक्तालय नाशिक अंतर्गत येणाऱ्या नाशिक,कळवण,धुळे,नंदुरबार,तळोदा,राजूर,यावल आदी प्रकल्पतील शाळांनी सहभाग नोंदवीला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा हे होते.तर निरीक्षक म्हणून खांडवी आणि गुटे यांनी काम पाहिले.
दरम्यान या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेत कळवण प्रकल्पातील आदिवासी सेवा समिती नाशिक संचालित किसन भोंडवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (हस्ते )ता.सुरगाणा या शाळेतील विद्यार्थ्यांनी" तारपा "नृत्य सादर केले. विभागीय पातळीवर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेसाठी या शाळेची निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे कळवणचे प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश,शिक्षणविस्तार अधिकारी एस.एल.चौधरी,प्राथमिक मुख्याध्यापक डी.एल.गांगुर्डे,माध्यमिक मुख्याध्यापक एम.बी.ठाकरे आदिनी अभिनंदन केले. आहे.तसेंच यशस्वी विद्यार्थ्यांना एल.व्ही.राऊत,पी.जी.वाघ,डी.बी.मोरे,एस.पी.देशमुख,पी.डी.खिरारी,आर.एस.गायकवाड,ए.पी.चव्हाण,टी.पी.जाधव,एम.एस.भोंडवे,एस.के.शेवरे,डी.सी.भोंडवे,एस.आर.ठाकरे,बी.एम.देशमुख,जे.व्ही.आहिरे आदिचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.