महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भीषण अपघातात निळवंडीचा युवक ठार ; दोन गंभीर जखमी

दिंडोरी - प्रतिनिधी :- वणी - दिंडोरी रस्त्यावर पिकअप व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ मोटरसायकल व महिंद्रा पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात अमोल भगवंत गवारी (21) रा. निळवंडी ता. दिंडोरी हा तरुण जागीच ठार झाला तर अनिल सुखदेव गवारी (25) व गोपी सुरेश गवारी (20) दोघेही रा. निळवंडी हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. अपघातातील जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने