महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

दिंडोरी l वैभव पगार :- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ संलग्न व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघा तर्फे जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी चे प्राचार्य श्री. शरद प्रभाकर शेजवळ यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार खासदार भास्करराव भगरे सर, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, ज्येष्ठ नेते गंगाधर माने, एस. के. शिंदे सर आदी मान्यवरांच्या हस्ते शरद शेजवळ यांना प्रदान करण्यात आला.
शेजवळ यांनी उपशिक्षक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक पदावर काम करताना विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून गुणवत्तावृद्धीबरोबर शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, विविध उपक्रम राबविणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
   या सन्मानाबद्दल मविप्र सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक प्रवीण नाना जाधव, रमेश आबा पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी भाऊ जाधव, दौलतदादा उखर्डे,माजी सैनिक संघाचे अध्यक्ष भारत खांदवे, दत्तात्रय जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार,तसेच सर्व सदस्य, सेवक व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने