महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सरन्यायाधीश हल्ल्याप्रकरणी निवेदन

दिंडोरी । प्रतिनिधी :- देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या  निषेधार्थ दिंडोरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसिलदार मुकेश कांबळे व पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देण्यात आले. 
    सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला हा भारतीय संविधानावर व लोकशाहीवर झालेला हल्ला अत्यंत क्रूर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने व संविधानामुळे एक बौद्ध व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश पदी विराजमान झाले. हेच या मनुवादी व जातीवादी मानसिकतेला सहन होत नाही म्हणून त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध करीत आहोत. सरन्यायाधीश भुषण गवई यांनी सुद्धा म्हटले आहे की, आम्हाला अशा घटनेने काही फरक पडत नाही हीच भावना आमची सुद्धा आहे, परंतु या घटना वारंवार घडू नये म्हणून अश्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष अमोल निकम, प्रदीप गांगुर्डे, कैलास गायकवाड, गौतम सोनवणे, सुरेश बागूल, संजय गांगुर्डे, चंद्रकांत गांगुर्डे, शाम गवारे, मधुकर पारे, राजेंद्र गांगुर्डे, किशोर सोनवणे, रमेश गांगुर्डे, बाळासाहेब जाधव आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने