महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यातील ऐतिहासिक हातगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

बोरगाव l प्रतिनिधी:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त "सेवा पंधरवडा" म्हणून देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून स्वच्छता अभियान सुरगाणा तालुक्यातील ऐतिहासिक हातगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
   या अभियानाचे नेतृत्व श्री. रामजी राठोड (तहसीलदार, सुरगाणा) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासन, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवर व अधिकारी:
श्री. रामजी राठोड – तहसीलदार, सुरगाणा
श्री. दिनेश पाडेकर, श्री. नानासाहेब बनसोडे, श्री. मोहन कुलकर्णी, श्री. सुयोग वाघमारे, श्री. हर्षल नेरकर – नायब तहसीलदार, सुरगाणा
श्रीमती सोनाली कोल्हे – मंडळ अधिकारी, बोरगाव
श्री. स्वप्निल पालवी – ग्राम महसूल अधिकारी, हातगड
तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी

   या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हातगड किल्ल्याच्या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कचरा व प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावली गेली. किल्ल्याच्या परिसरात झाडाझुडपांची छाटणी व साफसफाई करण्यात आली.

उद्देश:

या उपक्रमामागे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि "स्वच्छ भारत, सुंदर भारत" हे स्वप्न साकार करण्याचा संदेश देणे हा हेतू होता.

तहसीलदार श्री. राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
"इतिहास आणि संस्कृतीची ओळख असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आपणा सर्वांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. स्वच्छता ही केवळ एक मोहिम नाही तर आपली दैनंदिन सवय झाली पाहिजे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने