माळेगाव । धर्मराज चौधरी:- पेठ तालुक्यातील माळेगाव व परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांसह सोलर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
माळेगाव (वखारपाडा) ता. पेठ येथील शेतकरी कृष्णा चिंतामण गावित यांच्या शेतात गट क्र. 164 या शेतात असलेले ओसवाल कंपनीचे पाच एचपी सोलर पंपाचे वादळी वार्याने व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे भात, वरई, नागली आदी नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर मोठे संकट उद्भभवले आहे. परंतु सतत पाऊस, हवामान बदल, कीड व रोगराईमुळे वांग्याची इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास सततच्या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माळेगाव व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.