महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भिवतास धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

सुरगाणा । प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा व परिसर दिवाळी सणानिमित्त पर्यटकांच्या गर्दीने फुलत चालल्याने या परिसरात यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
     नाशिक जिल्ह्यातुन तसेच गुजरात राज्यातून पर्यटक आपल्या संपूर्ण परिवारसह दुचाकी, चारचाकी वाहनाने भिवतास येथे येऊन अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराचा व धबधब्याचा आनंद लुटून धबधब्या सोबत आवर्जून सेल्फी घेत आहेत. पर्यटक व निसर्ग प्रेमींसोबत अनेक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी या ठिकाणी भेटी देऊन धबधबा परिसराची पाहणी करण्यासाठी येत आहेत. विशेष करून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या परिसरात मोठया प्रमाणात गर्दी असते. या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. सदर धबधबा परिसरात निसर्गप्रेमी आनंदाने संचार करत सेल्फी घेतांना दिसून येतात. दिंडोरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यात अनेक धबधबे वाहत आहेत. यातच भिवतास धबधब्या 100 फूट खाली कोसळतो. आकर्षक रूप धारण केल्याने परिसरातील पर्यटकांना त्याची भुरळ पडते आहे. विषेश म्हणजे महाराष्ट्र व गुजरातच्या सीमारेषेवर असलेल्या या धबधब्याचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने पयर्ंटनस्थळ म्हणून घोेषित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या परिसरात कोणी स्टंटबाजी करू नये, धोक्याचे वळण असल्याने वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, अशा सूचना पोलीस यंत्रणेकडून दिल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने