महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत वाहतूक व्यवस्था कोलमडली; वाहतूक सुरळीतेसाठी पोलीसांची कसरत

दिंडोरी । प्रतिनिधी :-प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव सुरू झाल्याने दिंडोरी शहरात दळणवळणाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने मुख्य चौक व रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली ..
दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा केलेले पार्किंग वाहतुकीचा खोळंबा वाढत आहे. सायंकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. इमर्जन्सी रुग्णवाहिकांना तासनतास सायरन वाजवत जावे लागते, तेव्हा कुठे रस्ता मोकळा होतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पार्किंगची योग्य सुविधा नसल्याने नागरिक आपली वाहने रस्त्यावर लावतात, परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांनी मुख्य रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. अन्यथा संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दिंडोरी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक हवालदार कौतिक कांदळकर, बजरंग काहाटे आदी अधिकारी परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे कौतिक कांदळकर, बजरंग काहाटे हे दिवाळी सण बाजूला ठेवून व भर पावसात नागरिकांचे हाल होवू नये, यासाठी ते चोवीस तास वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवत असल्याने त्यांच्या कामगिरीचे नागरिकांनी त्यांचे स्वागत केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने