महाराष्ट्र ट्रायबल न्युज

माध्य व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे पर्यावरण जनजागृती,ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे कार्य या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे विद्यालयाचे प्राचार्य मधुकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती अभियान नाशिक यांचे मार्फत श्रीम.अश्विनी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण जनजागृती,ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे कार्य तसेच ग्रामपंचात मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना यांचे विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार नामदेव पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अहिरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.टी. बागुल सर यांनी मानले. आजच्या या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने