महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रेशनकार्ड ऑनलाईनबाबत निवेदन

दिंडोरी । प्रतिनिधी :- रेशनकार्ड ऑनलाईन होत नसल्याने रेशनकार्डधारक त्रस्त झाले असून त्वरीत ऑनलाईन सेवा सुरळीत करण्यात यंावा, अशी मागणी दिंडोरी तालुका भाजपच्या वतीने तहसिलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे. 
तहसिल कार्यालयामार्फत वितरित करण्यात आलेले शेकडो रेशन कार्ड हेतूपुरस्कर ऑनलाईन केले जात नाही. याबाबत अनेक वेळा तहसिल कार्यालयात संपर्क साधला असताना समाधानकारक उत्तरे दिले जात नाही. याउलट तालुक्यातील नागरिकांकडून रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक रेशनकार्ड धारकांची कार्ड ऑनलाईन करून देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट झाल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन किंवा विभक्त रेशनकार्ड देताना आधीच्या कार्डमधून कमी केलेली नावे ऑनलाईन प्रणालीवर आधीच्या कार्डमध्ये दिसतात परिणामी या रेशनकार्ड धारकांना मोफत मिळणार्‍या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व रेशनकार्ड धारकांना कृषी औजारे, प्रधान मंत्री आवास योजना, वैद्यकीय उपचार यासारख्या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ दखल घेऊन रेशनकार्ड ऑनलाईन कारण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. याप्रसंगी भाजपा वणी मंडळाध्यक्ष वसंतराव कावळे, वसंतराव थेटे, योगेश बर्डे, शाम हिरे, दत्तू भेरे,राकेश शिंदे,लकी शिंदे, मोहन देशमुख, विष्णू पाटील, जहीर शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने