महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बाऱ्हे येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

बाऱ्हे  नामदेव पाडवी :- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे येथे भारतीय संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
     आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मधुकर मोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बाऱ्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते, शिक्षक कैलास अहिरे हे होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची उद्देशिका यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक नितीन अहिरे व विलास भोंडवे यांनी संविधान निर्मिती व या कार्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयी सविस्तर माहिती सांगितली. सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी संविधानाचे महत्व, वाढते रस्ते अपघात, वाढती व्यसनाधिनता या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मधुकर मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संविधानाचे महत्व, आपले हक्क, आपले कर्तव्य व आपल्या जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच २६/११/२००८ रोजी मुंबई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व यानंतर बाऱ्हे पोलीस स्टेशन, डांग सेवा मंडळ माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज बाऱ्हे यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृती तसेच वाढते रस्ते अपघात, वाढती व्यसनाधिनता, रस्ते सुरक्षितता याविषयी विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात सहा.पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना वरील विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक नितीन अहिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक विलास भोंडवे यांनी मानले. आजच्या या कार्यक्रमास बाऱ्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र बाऱ्हे विद्यार्थी, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाऱ्हे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, बाऱ्हे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने