महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मविप्र कर्मवीर चषक केंद्र स्तरावर कब्बडी स्पर्धा वणी महासविद्यालयात संपन्न

वणी l प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाजाचे के आर टी वणी महाविद्यालयात सोमचार दिनांक 24/11/2025 रोजी मविप्र कर्मवीर चषक केंद्र स्तरावर कब्बडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्था वि समितीचे अध्यक्ष राकेश थोरात ,सतीश जाधव आर एल पाटील पोपटराव थोरात बबन पाटील ,घुले सर,भगवान पाटील,दिगंबर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम सुरुवात बजरंगबली पूजनाने करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षय राकेश थोरात यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आणि जीवनात खेळास अनन्य साधारण महत्व आहे आपल्या कला गुणांना वाव मिळावा आपल्यातले सुप्त गन विकसित व्हावे या हेतूने ही स्पर्धा खूप महत्वाची आहे या स्पर्धेत 12 मुलांच्या संघ तर 7 मुली संघांनी सहभाग नोंदविला यावेळली मुलांमध्ये के आर टी हायस्कूल वणी प्रथम क्रमांक पटकाविला तर महात्मा फुले हायस्कूल बेज कळवण यांनी मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला या सर्व विजयी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संचालक प्रवींननाना जाधव, स्था वि समितीचे अध्यक्ष राकेश थोरात ,सतीश जाधव आर एल पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस काळे ,उपप्राचार्य डॉ वाय एम साळुंके,डॉ आर आर चव्हाण,श्री बोंबले एस ऐ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने