गीताजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह
म्हेळुस्के(वार्ताहर):-सालाबादप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या गीताजयंती उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र म्हेळुस्के ता.दिंडोरी येथे ता.२५नोव्हेंबर ते २डिसेंबर २०२५ या कालखंडात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला महाराष्ट्रातुन नामवंत किर्तनकारांची उपस्थिती लाभणार असल्याने या किर्तनरुपी सेवेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम भजनी मंडळासह म्हेळुस्के ग्रामस्थांनी केले आहे.
या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ गुरुवर्य ह.भ.प.रामकृष्ण महाराज पिंपरखेडकर यांच्या हस्ते विणापूजन,ह.भ.प.सुनिल महाराज पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हेळुस्के ग्रामस्थांच्या हस्ते कलश पूजन करून होणार आहे.सप्ताहात पहाटे ४ते६ काकडा आरती,सायंकाळी ४ते६ हरिपाठ आणि रात्री ७ते९ हरिकीर्तन होईल.
सप्ताह कालावधीत ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर(ठाणे),ह.भ.प.योगी दत्तनाथ महाराज(परभणी)ह.भ.प.
एकनाथ महाराज चतुर शास्त्री(परभरणी)ह.भ.प.विष्णू महाराज जगताप(पैठण)ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील(भिवंडी)ह.भ.प. सुनिल महाराज झांबरे(बीड),ह.भ.प. जयवंत महाराज गोसावी(त्र्यंबकेश्वर)या नामांकित किर्तनकारांचे किर्तन श्रवण करता येईल तर ह.भ.प.रमाकांत महाराज डोखळे,खेडगांवकर (दिंडोरी) यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होऊन ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.