महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेन्शनर असोसिएशनची सभा संपन्न

   दिंडोरी  (प्रतिनिधी) -नाशिक जिल्हा पेन्शनर असोसिएशनची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली
        प्रथमतः दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून नंतर नुतन जिल्हाकार्यकारीणीचा परिचय करून देण्यात आला तदनंतर मुदतठेवी,सभासद वर्गणीवाढ,निवडश्रेणी वेतननिश्चिती,संगणक वसूली,नियमित सेवानिवृत्तीवेतन,तालुकावार बैठका घेणे,जमाखर्चास मंजूरी आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात  आली चर्चेत भिलाबागूल,रामदास अलई,राजेंद्र  गांगुर्डे,बाबूराव नाठे अकबर शेख,देविदास पगार,द.व.वाणी,हिरामण महाले,नेरकर,आहेरराव आदींनी भाग घेतला त्यावर माजी अध्यक्ष दिलीप वारे,कार्याध्यक्ष यशवंतराव गायकवाड,उपाध्यक्ष विजयकुमार हळदे,नामदेव सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले,यावेळी अंबादास अहिरे,दिलीप  पाटील,अशोक बडोगे यांचा असोसिएशनमध्ये प्रवेश केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर ह.भ.प.डांगे महाराज यांना समाजसेबद्दल सन्मानित करण्यात आले याप्रसंगी राजेंद्र शिरसाठ,पंडित धोंडगे,आनंदराव पगार,दत्तात्रय वरंदळ,प्रभाकर कोठावदे,कल्पना पाटील,प्रतिभा पुरकर,बाजीराव देसले,किसन पवार,रामदास कोल्हे,बाबाजी बर्डे आदी जिल्हा कार्यकारीणीसह तालुकाध्यक्ष,सरचिटणीस उपस्थित होते सुत्रसंचलन व आभार  सरचिटणीस धनराज वाणी यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने