महाराष्ट्र ट्रायबल न्युज

परीक्षित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नेहराई माता मंदिर परिसरात २०१ वृक्षांचे रोपण; सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

दिंडोरी l मनोज पाटील:-सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श वस्तुपाठ घालत दिंडोरी येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते परीक्षित विश्वासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेहराई माता मंदिर परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. 'पर्यावरण संवर्धन हीच काळाची गरज' हा मोलाचा संदेश देत या सामाजिक उपक्रमांतर्गत तब्बल २०१ विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
     ​वाढदिवसाच्या दिवशी होणारा अनावश्यक व अनाठायी खर्च टाळून समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प परीक्षित देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी सोडला होता. या संकल्पानुसार नेहराई माता मंदिर देवस्थानच्या भव्य परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे रोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लागवड केलेल्या सर्व २०१ झाडांचे नियमित संवर्धन, जतन आणि संगोपन करण्याची ठाम जबाबदारी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी याप्रसंगी घेतली.
      ​या स्तुत्य उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी प्रतीक जाधव, रोहिदास पवार, अक्षय बदादे, ऋषिकेश देशमुख, अमोल महाले, अविनाश केंग, रवी पवार, गोरख उघडे, मोहन महाले, इर्शाद शेख, छोटू शेख, देवा गांगुर्डे, सोनू उफाडे, रोहित गांगुर्डे, राहुल पाग, प्रेम डोंगरे, प्रकाश गांगुर्डे, आकाश वाघ, नैतिक गांगोडे, साहिल गांगुर्डे, गोटू पवार, कुणाल साळे, योगेश खराटे, करण गांगुर्डे, दीपक पागे, दगू सूर्यवंशी, निलेश पारधी, मोहन गोतरणे, गोपीनाथ गावंडे, सोमनाथ निकम, गणेश चव्हाण, संतोष टोपले, यश जाधव, मधुकर गोतरणे, गौतम मोरे, विकास भिडे, पंकज पवार, नितीन पवार, प्रदीप जोंधळे, पप्पू डंबाळे, अर्जुन भिडे, सुधाम जाधव, संतोष बदादे, सोमनाथ बदादे, काका शेळके यांसह अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       ​परीक्षित देशमुख यांच्या या उपक्रमाचे दिंडोरी तालुक्यासह सर्वस्तरातून मोठे कौतुक होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गणपत बाबा पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, माजी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, ज्येष्ठ नेते रमेश बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, वणीचे उपसरपंच विलास कड, मनोज शर्मा, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कृष्णा मातेरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष प्रतीक जाधव, मंगेश घोलप यांसह अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरून अभिष्टचिंतन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने