महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कवडासर येथे पोषण आहार मेळावा आणि आरोग्य तपासणी शिबीर

कवडासर येथे पोषण आहार मेळावा आणि आरोग्य तपासणी शिबीर

दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी आणि ग्रामपंचायत कवडासर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार मेळावा आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर वार मंगळवार दिनांक 04/02/2025 या दिवशी घेण्यात आले सदर कार्यक्रमात गरोदर, माता स्तनदा ,माता व सामान्य महिलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात महिलांना पोष्टिक आहाराचे महत्व व सकस आहाराच्या सवयी बद्दल मागदर्शन करण्यात आले.त्यामध्ये आहारतज्ञ निंबा राठोड यांनी पोषण आणि आरोग्य या विषयावर संत्र आणि प्रात्यक्षिक करून दाखवले.तसेच पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये 3 महिलांनी सहभाग नोंदवला व त्यामधून बक्षीस देण्यात आले . तसेच बिर्ला आय हॉस्पिटल चे डॉक्टर गणेश मस्के व त्यांचे कर्मचारी डोळे तपासणी शिबिर साठी उपस्थित होते त्या मध्ये 44 नागरिकांनी डोळे तपासले.यावेळी 36 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली .या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत कवडासर येथील ग्रामसेविका केदार मॅडम,सरपंच ताराबाई राऊत, उपसरपंच मधुकर कराटे मा.सरपंच कृष्णा राऊत आशा सेविका रत्ना महाले अंगणवाडी सेविका शांता पाडवी ग्रां.पं.सदस्य जगदीश पाडवी,शिपाई, युवराज गवळी , चंदर राऊत यांचे सहकार्य लाभले.
       चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया चे मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार,नंदिनी चौधरी व अजय तासकर व आदी कर्मचारी व महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने