नळवाडपाडा येथे नेत्र तपासणी शिबिर आणि पोस्टर स्पर्धा व योगासनाचे आयोजन.
दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी आणि ग्रामपंचायत नळवाडपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार मेळावा वार गुरूवार दिनांक 06/03/2025 या दिवशी घेण्यात आले त्यामध्ये 51 नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला तसेच 15 मुला मुलींनी पोषणावर आधारित पोस्टर स्पर्धांमध्ये सहभाग घेतला व त्यामध्ये 3 आकर्षक बक्षीस मिळवले . त्या ठिकाणी योगा बद्दल नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले त्यामध्ये 10 नागरिकांनी योगासन करण्यासाठी सहभाग घेतला. डोळे तपासणीसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिकचे डोळे तपासणीचे श्री गणेश म्हस्के व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत नळवाडपाडा येथील सरपंच हिरामण गावित, आशा सेविका गजरा महाले ,मनिषा गावित अंगणवाडी सेविका कविता गवळी, मंदा महाले, सुमन शिंदे शिपाई रामदास महाले, देवराम चौधरी यांचे सहकार्य लाभले.
चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया चे सहायक प्रकल्प व्यवस्थापक विनोद अडोकर, मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार,नंदिनी चौधरी मेघा गायकवाड आणि अजय तास्कर व आदी कर्मचारी व महिला उपस्थित होते.
Tags
Maha Tribal News