maharashtratribalnews

हरसूल महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे जयंती साजरी

देवडोंगरी l शंकर निंबारे  
दि.२६ हरसुल येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने साजरी करण्यात आली.
     याप्रसंगी, प्राचार्य डॉ मोतीराम देशमुख यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या " सामाजिक , शैक्षणिक तसेच राजकीय कार्याबद्दल माहिती सांगितली. लोकनेत्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये व कृषी विद्यालय ,आदिवासी आश्रम शाळांची उभारणी केली. त्यांच्या कार्यामुळे नाशिक जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासात लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे मोठे योगदान आहे. मालेगाव तालुक्यातील जनतेचा पाणीप्रश्न त्यांनी सोदविण्याकरिता त्यांचे विशेष योगदान आहे. याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
     याप्रसंगी, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ.मीनाक्षी पाटील , आय. क्यू. एस.सी. समन्वयक डॉ.संदीप वाघ, प्रा.कुणाल वाघ, प्रा .अजय अहिर ,महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी ,विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने