दिंडोरी । मनोज पाटील
नाशिक - पेठ महामार्गावरील उमराळे बु. चौफुलीवर अवैधपणे सुगंधी गुटखा विक्रीसाठी पहाटे सुमारास घेऊन जात असतांना दिंडोरी पोलिसांनी सापळा रचत गुटखा व वाहतूक करणारे वाहन असा एकुण 37 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमराळे बु. चौफुलीवर अवैध सुगंधी गुटखा विक्रीसाठी जात होते. त्याचवेळी पहाटेच्या पोलिस गस्त घालित असतांना सफेद रंगाची अशोक लेलॅन्ड कंपनीची क्रमांक एमएच 04 एलवाय 8030 या वाहनामध्ये अवैध गुटखा आढळून आला. 2 लाख 17 हजार 800 रुपयांचे 1.100 विमल पान मसाल्याचे पिवळ्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंमत 198 रुपये प्रमाणे आहे. 24 हजार 200 रुपये किमंतीचे सुंगधीत तंबाखुचे पिवळ्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंरमत 22 रुपये प्रमाणे, 5 लाख 17 हजार रुपयांचे विमल पान मसाल्याचे हिरव्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंरमत 470 रुपये आहे. 33 हजार किंंमतीचे सुगंधीत तंबाखू पॅकेट प्रत्येकी किंमत 30 रुपये प्रमाणे, 3 लाख रुपये िंंकमतीची सफेद रंगाची अशोका लेलॅन्ड कंपनीची ग्राडी क्र. एमएच 04 एलवाय 8030) असा एकुण 37 लाख 92 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिस शिपाई मधुकर बेंडकोळी यांना दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केला आहे. आरोपी योगेश देवगीर गोसावी (38) रा. अवनखेड याचंयावर गुन्हा दाखल असून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहे.