देवडोंगरी l शंकर निंबारे :-दि.15 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संविधान लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनापर आधारित सोप्या पद्धतीने उपस्थितांना ग्रामपंचायत अधिकारी सतिश बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी भागीरथ घुटे, नामदेव निंबारे, तुकाराम पागी, मंजुळा पवार, महेश शेवरे तसेच इकोनेट संस्थेचे स्वंयसेवक समवेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.