बाऱ्हे l नामदेव पाडवी :-महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना सुरगाणा तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवड जिल्हाध्यक्ष अरूण पाटील बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सुरगाणा तालुका अध्यक्षपदी मधुकर गावीत, कार्याध्यक्ष श्रीम. भगवती पवार, उपाध्यक्ष हंसराज खांबाईत, सचिव शांताराम चौरे, सहसचिव विजय चौधरी, खजिनदार श्रीम. निर्मला पळंजे, कार्यकारी अध्यक्ष पांडुरंग धूम, संघटक भास्कर चौधरी, राजेश दोडके, सहसंघटक आनंद गावीत, सदस्य सुरेश वाघमारे, रामचंद्र वाघमारे, नारायण गायकवाड, भास्कर चौधरी, सुरेश कामडी, दौलत पवार, मार्गदर्शक सदस्य शिवाजी पवार आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली. नवनिर्वाचित पदग्रहण केलेल्या पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा सचिव अरुण महाले, जिल्हा सचिव रवींद्र जाधव, कार्यकारी अध्यक्ष मुकेश कामडी, पेठ तालुकाध्यक्ष दौलत पाटील, नाशिक जिल्हा सहसचिव लखन खटाळे, जिल्हा संघटक परसराम चौधरी, सुरगाणा तालुका माजी अध्यक्ष गोपाळ गायकवाड यांच्यासह सुरगाणा तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. जिल्हाअध्यक्ष अरूण पाटील बोडके यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला व संघ बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे पोलीस पाटील संघाच्या ध्येय धोरण वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले*
नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देत सिन्नर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ तालुका म्हणून आदर्श निर्माण केला व सर्व पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करून तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहून आदर्श काम करून तालुक्याचे नाव उंचवाल अशा अपेक्षा व्यक्त केल्या. पांडुरंग धूम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नवनिर्वाचित उपाध्यक्ष हंसराज खांबाईत यांनी आभार व्यक्त केले.