वणी (ता. दिंडोरी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी नितीन पवळे याला महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. योगासन या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची निवड झाली आहे.
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते नितीन पवळे याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नितीन पवळे यांनी आपले शिक्षण वणी येथील महाविद्यालयात प्रथम वर्ष कला वर्गात घेतले होते. त्यांच्या या यशाबद्दल म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस डॉ.ॲड. नितीनजी ठाकरे, दिंडोरी तालुका कार्यकारिणी संचालक प्रवीण नाना जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, स्थानिक विकास समिती अध्यक्ष राकेश थोरात, उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके, प्रा. नितीन बोरसे (IQAC समन्वयक) तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रविंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.