maharashtratribalnews

भाजपा त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्षपदी सुयोग वाडेकर तर हरसुल मंडलाध्यक्षपदी जयराम भुसारे.

देवडोंगरी l शंकर निंबारे  दि.21
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संघटनपर्व अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र मध्ये ९६३ मंडलांच्या निवड जाहीर करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते सुयोग वाडेकर यांची त्र्यंबकेश्वर तालुकाध्याक्ष (मंडलाध्याक्ष) पदी निवड करण्यात आली. तर हरसुल विभागातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते जयराम भुसारे यांची हरसुल मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव जिल्हा निवडणूक प्रमुख गिरीश पालवे, त्र्यंबकेश्वर मंडल निवडणूक प्रमुख मनीषाताई बोडके तर हरसुल मंडल निवडणूक प्रमुख भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. 
      महाराष्ट्र प्रदेश भाजप कडून कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निश्चित झालेले नाव बंद लिफाफा मध्ये पाठवण्यात आले होते. बैठकीत मंडल अध्यक्ष पदासाठी शिक्कामोर्तब केलेले नावे आज दिनांक २० रोजी मंडल निवडणूक प्रमुख मनीषा बोडके यांनी सुयोग वाडेकर यांचे नाव जाहीर केले तर हरसुल मंडल निवडणूक प्रमुख भाऊसाहेब शिंदे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित त्र्यंबकेश्वर मंडलाध्याक्ष आणि हरसुल मंडलाध्याक्ष यांनी आजपर्यंत पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडले आहेत. भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यरत असुन विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन, उपक्रम कार्यक्रम यशस्वी केले आहे. त्याचीच पावती म्हणून त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी सुयोग वाडेकर यांची निवड करण्यात आली. तर भारतीय जनता पार्टी हरसुल मंडल अध्यक्षपदी जयराम भुसारे यांची निवड करण्यात आली.
      यावेळी भाजपाचे अधिकारी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने