maharashtratribalnews

उंबरपाडा येथे SFI चे जिल्हा अधिवेशन उत्साहात

संपादक l कृष्णा पवार:-एसएफआयचे नाशिक जिल्हा
अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसएफआय महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव उपस्थित होते.
      मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व राज्य सचिव मंडळ सदस्य इंद्रजीत गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एसएफआय ही संघटना शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहातील विविध प्रश्नांसाठी शासनाशी सातत्याने संघर्ष करत असते. उत्तम दर्जाचे शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षक, शाळा व महाविद्यालयांतील दर्जा यासाठी आंदोलने, मोर्चे उभारणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
      प्रास्ताविक भाषणात रामचंद्र गांगुर्डे यांनी अधिवेशनाचे महत्त्व स्पष्ट केले.
मागील तीन वर्षातील कामाचा आढावा घेत पुढील तीन वर्षांसाठी कार्ययोजना मांडली.
      राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एसएफआय ही संघटना जिल्हा व तालुका स्तरावर शैक्षणिक आणि सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवत असते. देशपातळीवरही विद्यार्थ्यांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे.
     अधिवेशनात मोहन पवार यांनी उपस्थित एसएफआय पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राहुल गायकवाड, भागवत गायकवाड, राजेश महाले, धम्मदीप औटे, कुणाल माळी, रोहित पिचड यांच्यासह उंबरपाडा, श्रीभुवन, अलंगुण, चिंचला येथील एसएफआय सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने