maharashtratribalnews

दहशतवादी हल्ल्याचा दिंडोरीत निषेध. माजी सैनिक संघटनेचे तहसीदारांना निवेदन

दिंडोरी l प्रतिनिधी-जन्मू -काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ला हा अतिशय केविलवाणा प्रकार आहे. या हल्ल्यात काही पर्यटकाना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा पाकिस्तानी दहशतवाद्यांना कठोर शासन करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय माजी सैनिक संघ व दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे याना निवेदन देण्यात आले. 
       निवेदनात म्हटले कि, जन्मू काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी काही भारतीय नागरिक गेले असता पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार अतिशय केविलवाणा असून गोळीबार करणार्‍या पाकिस्तानी दहशतवादयाना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे व मृतांना श्रध्दांजली अर्पण करणारे फलक तसेच तिरंगा हाती घेत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना माजी सैनिक संघ, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, संतोष कथार, डॉ. संदीप गोसावी,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव, दत्तू भेरे, बंडू भेरे, निवृत्ती कथार, तुषार वाघ,माजी सैनिक गणपत जाधव, उत्तम बुणगे, भिकन इचाळे, यमाजी इचाळ, चंद्रभान कळमकर, हिरामण पिंगळ, शिवाजी निसाळ,, वैजनाथ जगताप, रशिद शेख, विजय पाटील, खंडेराव आहेर, उत्तम बैरागी, पत्रकार संघाचे विलास ढाकणे, नितीन गांगुर्डे, भगवान गायकवाड,मनोज पाटील,प्रमोद ठेपणे, श्रीराम देवकर आदीसह 35 माजी सैनिक उपस्थित होते.
फोटो-
दहशतवादी हल्ल्याचा दिंडोरीत निषेध करून तहसीलदार मुकेश कांबळे यांना अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदन देतांना अध्यक्ष भारत खांदवे, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आदी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने