maharashtratribalnews

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ओतूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

कळवण l प्रतिनिधी दि.29- राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कळवण आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे किशोरवयीन मुला-मुलींना उद्देशून विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
      हा कार्यक्रम किशोर वयातील मुला-मुलींना त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकासासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच विवाहपूर्व सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 1000 लोकसंख्येमागे निवडक किशोरवयीन मुले व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून योग्य माहिती व मार्गदर्शन समाजात पोहोचवता येईल व मुला-मुलींना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल.
      प्रशिक्षण समुपदेशक अनिल चव्हाण यांनी दिले. कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बंगाळ सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बहिरम सर, BCM भवर सर, गट प्रवर्तक हरिश्चंद्र ठाकरे, आशा कार्यकर्त्या, PHC ANM व संबंधित आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      हा उपक्रम किशोरवयीन पिढीच्या आरोग्यदृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरला असून, अशा उपक्रमांद्वारे सामाजिक आरोग्य जागृतीस बळकटी मिळणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने