दिंडोरी । प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय पाटील यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रय पाटील यांची वाटचाल राहिलेली आहे. शरदचंद्र पवार व कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांंच्यासोबतच काँग्रेस पक्षातून दत्तात्रय पाटील यांनी राजकीय वाटचाल सुरु केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेनंतर दत्तात्रय पाटील हे श्रीराम शेटे यांच्या समवेत शरदचंद्र पवार यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेस विभाजनानंतरही आजतागायत दत्तात्रय पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले. खासदार भास्कर भगरे यांना निवडून आणण्यात दत्तात्रय पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दत्तात्रय पाटील यांच्या निवडीबद्दल कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते, खा. भास्कर भगरे, अनिल देशमुख, रायुकॉ जिल्हाध्यक्ष शाम हिरे, सुनील शेटे, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, नरेश देशमुख, मधुकर गटकळ, युवक तालुकाध्यक्ष राहुल उगले, समाधान संधान, छबुराव मटाले, , रावसाहेब संधान, ज्ञानेश्वर दवंगे, आदींसह कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.