दिंडोरी । प्रतिनिधी दि.13 :-दिंडोरी येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान महावीर जयंतीनिमित्त पूजन व पुष्पहार करण्यात आले. यावेळी दिंडोरी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. संपूर्ण जगाला ‘अहिंसा परमोधर्म ’ व ‘ जियो और जीने दो ’ हा अजरामर संदेश देणारे जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांचा जन्मोत्सव वणी शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महावीरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये जैन बांधवांबरोबर इतर धर्मीय ग्रामस्थ उपस्थित होते. ‘भगवान महावीर की जय ’ तसेच ‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’ अशा घोषणा देत महिला तसेच आबाल वृद्धांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला. मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
यावेळी अरुणकुमार मुनोत, माणकशेठ बुरड, डॉ. शितलकुमार पहाडे, सुमित चोरडीया, अमित चोरडीया, डॉ. निता बुरड, डॉ. प्रगती पहाडे, अल्केश शाबर्दा, योगेश शिंगवी, मिलींद चोरडीया, आदेश लोढा, अजित पटवा, मनोज बडजाते, निलेश बडजाते, हेमंत जैन, डॉ. अतुल बुरड, निरव बुरड, जगन खिंवसरा, मुकूंद भुम, गोकूळ साबद्रा, वर्षा साबद्रा, विनोद शिंगी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.