maharashtratribalnews

मडकीजांब-इंदोरे शिव रस्त्याचे काम निकृष्ट?

दिंडोरी । मनोज पाटील 
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब-इंदोरे शिवरस्ता काम साधारण गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुरू करण्यात आले आहे. सदर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मडकीजांब सरपंच रोहिणी मोरे, गोकूळ वडजे यांनी केला असून त्वरीत या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
       मडकीजांब-इंदोरे शिव रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्ता कामाच्या अंदाजपत्रक वारंवार मागणी करून देण्यात आलेले नाही. रस्ता कामाबाबत माहिती देणारा कुठलाही फलक लावण्यात आला नाही. रस्ता कामाच्या दर्जा इतका निकृष्ट आहे की तो मोठ्या प्रमाणावर फुटण्यास सुरुवात झाली आहे. सदर रस्ता कामाची दर्जा तपासणी तातडीने करावी. कामाच्या दर्जात सुधारणा होऊन खालचे थर दुरुस्त केल्याशिवाय वरील थर टाकू न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तसेच संघटितपणे फसवणूक करून ग्रामस्थांवर अन्याय करणारे ठेकेदार, अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी वडजे, गोकूळ वडजे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने